कथा राष्ट्रीय सेवा योजनेची
- डॉ. सोपान बोराटे.
पारतंत्र्यात सुरू झालेली ही गोष्ट. भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. राज्य कसलं? हिंदुस्थानच्या भूमीला आणि जनतेला लुटायचं परमिटच ब्रिटिशांना दिलेलं. कच्चा माल अगदी स्वस्तात घ्यायचा. पक्का माल मात्र महागात विकायचा. भारतीय असेच लुबाडले जायचे. या लुटीला मदत व्हावी,अगदी सहजची लूट जास्त व्हावी, त्यासाठी इथलीच माणसं वापरली जावी म्हणून इंग्रजांनी हिंदुस्तानात एक गोष्ट केली. शिक्षणाची गंगा गावोगावी नेली. मुलं-मुली शिकल्या. खूपखूप शिकल्या. कुणी बी.ए. झालं, कुणी एम्.ए. झालं, कुणी आय्.ए.एस्. झालं, कुणी बॅरिस्टर झालं, कुणी डॉक्टर झालं, कुणी शिक्षक झालं तर कुणी इंग्रजांचं निव्वळ चाकर पण झालं. शिक्षण वाढलं. शाळा वाढल्या. शिकणारी मुलं-मुली वाढल्या, आणि काय शिकवावं? कसं शिकवावं? ह्याच्या सरकारच्या चिंता पण वाढल्या. सरकार नडलं. काळजीत पडलं. सरकारचं घोडं अडलं. त्यानं समाजातील मोठ्या माणसांपुढं हात जोडलं. सरकार त्यांना म्हणलं, `काही तरी करा पण ह्या पोरांना काय शिकवायचं त्याचं मार्गदर्शन करा. ही पोरं तुमची, हा देश तुमचा. तेव्हा या देशातील मुलं शिकायला हवीत. त्यांचा विकास व्हायला हवा; म्हणून आमची धडपड. त्याला तुमचा हात लागायलाच हवा.'
त्या काळी आपल्या देशात खूप मोठ्ठी माणसं होती. ती अभ्यासू होती. प्रामाणिक होती. धीट होती. शूर होती. ह्या समाजानं आपल्याला मोठं केलं. त्याचं आपल्यावर मोठं उपकार आहेत, याची त्यांना जाणीव होती. त्यांना वाटायचं-आपल्या देशातील मुलामुलींनी शिकावं, खूप खूप शिकावं, नोकरी- धंदा करावा. पगार-पाणी मिळवावा, खूप पैसा कमवावा. त्यातील थोडातरी वाटा ह्या समाजासाठी खर्च व्हावा, ही जाणीव त्यांना व्हावी, असं शिक्षण सरकारनं द्यावं. ते घेण्यासाठी मुलांनी शाळेत जावं. शाळेत हे शिकावं. मग कॉलेजात जावं. तिथं आणखी शिकावं.अन् मग समाजासाठी झटावं. त्या काळी आपल्याकडे अशी एक व्यक्ती होऊन गेली, जिची उभ्या जगानं पूजा केली. तिचं नांव डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्. दक्षिण भारतात त्यांचा जन्म झाला. हिंदू संस्कृतीच्या अभ्यासाने त्यांचा उध्दार केला. तोच अभ्यास मुलांनी करावा म्हणून काॅलेजात पोरांना उपदेश केला. मुळातच हाडाचा शिक्षक. अभ्यासाची सवय खूप. खूप खूप पुस्तकं वाचली. जुनी वाचली, नवी वाचली. भारतीय वाचली, परकीय वाचली. त्यातून त्यांना जे कळलं ते साऱ्यांना सांगितलं. लोकांना ते पटलं. त्यामुळे ते शिक्षकाचे झाले कुलगुरू. स्वतंत्र भारताचे रशियातील राजदूत आणि शेवटी भारताचे राष्ट्रपती! असे हे डॉ.राधाकृष्णन्.त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या शिक्षणाचा विचार करणारा आयोग भारत सरकारने नेमला. तो त्यांच्याच नावाने प्रसिद्ध झाला- डाॅ. राधाकृष्णन् आयोग.
या आयोगानं नीट विचार केला. `शिक्षण कसं असावं '? हा विचार अखिल भारताला दिला. त्या पूर्वी सगळे म्हणायचे, `राष्ट्रीय सेवा सक्तीची असावी. तरूण ह्या राष्ट्राचे आधारस्तंभ. तेव्हा त्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण व्हायलाच हवी. तिचे शिक्षण झाडून सर्व विद्यार्थ्यांना मिळायलाच हवे.' पण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणाले, `नाही!राष्ट्रीय सेवेची अशी सक्ती नको. सक्तीनं केलेली सेवा ही सेवा नसतेच! खरी सेवा तीच - ज्यात तळमळ असते, कळकळ असते, सेवाभाव आतून येतो. नकळत सेवेला घेऊन जातो. ज्यांच्यात हा सेवाभाव, त्यांनाच हा विषय असावा. सर्वांनाच तो सक्तीचा नसावा.' भारत नुकताच स्वतंत्र झालेला. त्याला जगाबरोबरच नव्हे, तर जगाच्याही पुढे प्रगतीची भरारी घ्यायची होती. त्यासाठी सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे जाणारी तरूण पिढी तयार करायची होती. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु. त्यांनी तो ध्यासच घेतला. भारताच्या सर्वांगिण प्रगतीचा जणू वसाच घेतला. स्वत: खूप काम केलं. इतरांनाही कामाला लावलं. १९५३चं साल आलं. भारतातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना बोलावणं गेलं. सर्व मुख्यमंत्री दिल्लीला आले. नेहरूंबरोबर सभेला गेले. सभेत नेहरू बोलते झाले.
`आपला भारत वयानं लहान. आपली लोकशाही अनुभवानं लहान. देश मात्र आकारानं महान! असा देश संभाळणं सोप्पं काम नाही. आजची पोरं, उद्याचे तरूण, मदतीला आले नाही, तर काही खरं नाही. तेव्हा ह्या पोरांनी जरूर शिकावं. खूप खूप शिकावं. पण शिकत असताना त्यांना कोण शिकवतो? कसे शिकवतो? हे ध्यानात घ्यावं.शिक्षण घेतलं की, ज्यानं शिकवलं त्या देशाच्या भल्यासाठी थोडं तरी पुढं यावं. त्या देशाच्या प्रगतीसाठी आपापलं योगदान द्यावं. सर्व मुख्यमंत्री बोलले, `असं कसं व्हावं?नेहरूजी तुम्हीच सांगा आमच्या हातून हे कसं काय व्हावं? अन् ह्या देशाचं भलं होऊन जावं?' नेहरू बोलले, `नीट ध्यानी घ्यावं, मी काय म्हणतोय ते पटतंय का बघावं; सर्वांना पटलच तर आमलात आणावं. मला मात्र वाटतं आणि मनाला पटतं. निदान कॉलेजसाठी तरी समाजसेवा सक्तीची करावी आणि तिची मुदत पण ठरावी.' असाच विचार चालू होता.निर्णय काही लागत नव्हता. झालं. पुन्हा एकदा ठरलं. आयोग नेमायचा. आयोगाचा आदेश आपण पाळायचा. या वेळी आणखी एका विद्वान व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. ती विद्वान व्यक्ती होती- डॉ. सी. डी. देशमुख. जागतिक स्तरावरील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ. त्यांचा स्वत:च्या ज्ञानावरील विश्र्वास किती? तर परीक्षेच्या निकालावेळी - जी , आय्. ए. एस्. परीक्षा तेव्हा सर्व ब्रिटिश साम्राज्यात म्हणजेच जवळजवळ जगभर एकाच वेळी घेतली जायची. तिच्यात `दुसरा कोण आलाय? 'असं खात्रीनं विचारणारे. कारण `पहिला मीच येणार !' असं खात्रीनं सांगणारे- असे ते डॉ.सी. डी. देशमुख.
त्यांच्या समितीने अभ्यास केला.त्याचा अहवाल सरकारला दिला. त्यात त्यांनी लिहिलं - `ज्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि कॉलेजला जायचं मनात आणलं, त्यांनी हे ध्यानात घ्यावं. त्यांना जे काही शिकायचंय ते त्यांनी शिकावं; पण त्याच वेळी किमान ९ ते १२ महिन्यांएवढं राष्ट्र सेवा शिक्षणात टिकावं. त्यामध्ये त्यांनी थोडंसं सैनिकी प्रशिक्षण, थोडीशी समाजसेवा, थोडंसं शारीरिक श्रम आणि सर्वसामान्य शिक्षणही घ्यावं.त्यासाठी सरकारनं जरूर ती माणसं नेमावी. लागेल त्या पैशांची व्यवस्था करावी.' योजना खरंच चांगली. सर्वांना ती भावली. पण - पैशांचा प्रश्न आला आणि मग नाही पावली. खर्चाची सोय झाली नाही; योजना लागू झालीच नाही. दिवस असेच जात होते.सरकारचा गाडा चाललाच होता.मंत्री येत होते, जात होते.ज्यांना जे जे वाटेल ,जे जे पटेल ते ते जनतेसाठी करत होते.देश सक्षम बनत होता. हळूहळू प्रगती करत होता. १९६२ चं साल आलं. लोकशाही राज्यात एक आक्रितच घडलं. भारतावर परकिय आक्रमणाचे ढग जमा झाले. सर्वांनी एक होऊन प्रतिकार करण्याचे दिवस आले. आणीबाणी जाहीर झाली.कडू - गोड स्मृती सोडून गेली. याच आणीबाणीत एक निर्णय झाला. शिक्षण मंत्रालयानं तो विद्यापीठांना दिला. विद्यापीठांकडून सर्व कॉलेजांना आला. `सर्वांनी एक ध्यानात घ्यावं. मिल्ट्रीचं दर्शन पोरांना व्हावं. कॉलेजातील तरूण तरूणींना हे सांगा.`त्या' शिक्षणासाठी लागूद्यात रांगा. निवडून निवडून त्यातून घ्यावं.उत्तम शिक्षण त्यांना द्यावं. तीन वर्षांनी सैन्यात जावं. नोकरीची चिंता नाही. बेकारीचं भय नाही. भरपूर पगार मिळेल. देशसेवेचं पुण्य पदरी पडेल.' एन्.सी.सी. म्हणती तिला. आजपर्यंत तिचा चांगला बोलबाला.
सैन्याची चिंता मिटली. देशाची काळजी मिटली. हे एक झालं बरं. तरी भारताचं नव्हतं काही खरं. सैनिक लढती सीमेवर. पण शत्रू फक्त सीमेवरच नाही; तो तर भारतात सर्वदूर आहे. खेड्यात आहे. शहरात आहे. झोपडीत आहे. महालात आहे. थोरात आहे. पोरात आहे. त्याच्या हातात बंदूकीपेक्षाही भयंकर अशी अज्ञान , अंधश्रद्धा, कुपोषण, भ्रष्टाचार, प्रदूषण, रोगराई यांसारखी कित्तीतरी शस्त्रं. तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी आपणास हवीत तशीच शस्त्रं आणि ती चालवणारे सैनिक. हे सैनिक म्हणजे सीमेवरील नव्हे! पायात बूट, डोईला हेल्मेट, हातात बंदूक आणि कमरेला सुरा असणारे. रानावनात फिरणारे, वेळप्रसंगी एकएकटेच दहा दहांना मारणारे. हे सैनिक म्हणजे समाजसेवक. जे राहती जनांत. फिरती जनांत. चांगला विचार नेहमी मनात. समाजाच्या कल्याणाची त्यांना तळमळ. प्रगतीसाठी सदा धडपड. स्वत:कडे लक्षपूर्वक दुर्लक्ष. समाजाकडे मात्र सदा लक्ष. समाजसेवेला सदा दक्ष!
कुठं मिळतील हे सैनिक? कुठं त्यांना शोधायचं? काय करायचं सांगा आता? सुरू झाल्या पुन्हा बाता! कुणीतरी बोल्ला खरा. आता जरा असं करा. परदेशा वारी करा. जिथं जिथं हे शिक्षण, तिथं तिथं जावं थेट. उघड्या डोळ्यांनी द्यावी भेट.भेटीमध्ये एकच ध्यास. सेवा योजना करू अभ्यास. कोण आहे बरं असा, जो घेईल हा वसा? तो पुरा करण्यासाठी गाळेल घाम पसा पसा? शोधाशोध सुरू झाली. एक व्यक्ती ध्यानी आली. प्रा. के.जी.सैदाईन -त्यांची तिथं नेमणूक झाली. आदेश दिला त्यांच्या हाती. वाचत ते निघून जाती. `आपण युगोस्लोव्हियाला जावं. जर्मनी, नॉर्वे, फिलीपिन्स, इंग्लंड, जपानलापण जावं. स्विडन आणि अमेरिकेलाही जावं. तिथल्या एन्.एस्.एस्.चं अवलोकन व्हावं. अगदी बारीकसारीक गोष्टींचं पण टिपण घ्यावं. भारतात यावं. विचारी व्हावं. आपला देश - त्यांचा देश, आपली माणसं - त्यांची माणसं यांचा नीट विचार व्हावा. तिथे काय चाललंय? इथं काय चालेल? तिथं ते कशासाठी? इथं हे कशासाठी? असं आणि तसं. हे आणि ते. असा अगदी बारीक सारीक विचार व्हावा. चार चौघांचा सल्ला घ्यावा. भारतासाठी एका नव्या, चांगल्या योजनेचा मसुदा तयार व्हावा. सरकारच्या हाती ठेऊन द्यावा.'
प्रा. के.जी. सैदाईन परदेशात गेले. जे जे दिसलं ते ते सगळं कागदावर घेऊन आले. नीट विचार केला. सर्व कागदावर लिहिला. एक छानसा अहवाल तयार झाला. सरकार दरबारी सादर केला. त्यात त्यांनी लिहिलं,
`एक ध्यानी घ्यावं. सक्तीचं म्हणणं पहिलं सोडून द्यावं. ज्याला हे आवडेल त्यानं इथं खुषाल यावं. समाजसेवेचं व्रत घ्यावं. माध्यमिक स्तरावर हे सुरू व्हावं. हळूहळू कॉलेजला न्यावं. त्याचा एक फायदा होईल. समाजसेवेचं बाळकडू बालपणीच मिळेल. मोठेपणी बाळ समाजसेवेला पळेल.' पुन्हा उलट सुलट विचार झाला. शेवटी त्याला आकार दिला. त्यामध्ये ध्येये आली. दिशा आली. बोधचिन्ह आलं. घोषवाक्यही आलं.सर्व नीट समजून घेतलं - एन्. एस्.एस्.चं काम झालं. आता इकडं लक्ष द्यावं. `Not Me But You ' ध्यानात घ्यावं. बोधवाक्य एन्. एस्. एस्.चं सदा पाळत जावं. `मी नाही माझ्यासाठी, मी आहे तुमच्यासाठी ' रात्रंदिन आचरणी यावं. जेव्हा जेव्हा जाल, जिथं जिथं जाल तेव्हा तेव्हा आणि तिथं तिथं एन्.एस्.एस्.चं बोधचिन्ह छातीवर ल्यावं. लाज त्याची वाटू नये.विसर कधी पडू नये.कशासाठी? हे चिन्ह? याचा विचार नीट व्हावा.महान अर्थ चिन्हातील आपण इतरां सांगत जावा. कुठून आलं हे चिन्ह? कां ते तसं केलं? त्याचा रंग तोच कां? दुसरा रंग कां नाही? हे सुध्दा सांगायचं.काही नाही टाळायचं.
भारत आपला देश महान. संस्कृती त्याची तशीच महान. तशी ती खूप जुनी, पण खूप पुढारलेली. आजही आपण जावं. ती पाहून अचंबित व्हावं. अजिंठा पहा. वेरूळ पहा. कार्ले पहा. भाजे पहा.ओरिसातील कोणार्कचं सूर्यमंदिरही पहा. कित्ती भव्य आकार त्याचा! कित्ती सुबक रचना त्याची!! एकदा पहावं, पहातच रहावं. सूर्य ज्या रथामध्ये त्याची चाकं मोजा जरा. चोविसचा आकडा भरंल पुरा. यातीलच एक चाक आपल्या बोधचिन्हावर. हे चाक सांगे काय? आणि ती चोवीसच कां? याचा विचार नीट करा. दिवसाचे तास? आहेत चोवीस. चाकांची संख्या ? ती पण चोवीस! काय सांगे चाक पहा. तुम्ही गतिमान रहा. दिवस काय अन् रात्र काय? तमा त्याची बिल्कूल नको. गती थांबाय बिल्कूल नको. असंच काम समाजासाठी एन्.एस्.एस्.मध्ये करा. काळ वेळ पाहू नका. दिसलं काम टाळू नका. संपल्याशिवाय थांबू नका. एकच चाक धावत नाही. कुठेही ते पळत नाही. एक दिशा, एक गती.म्हणून यश सारथ्या हाती. तुम्हीसुध्दा तेच करा.सहकार्याचा ध्यास धरा. यश मिळेल तुम्हा करा. चाकाकडं नीट पहा.आऱ्या त्याच्या कित्ती ताठ! मोजून पहा... भरतील आठ! दिवसाचे प्रहर ? आहो आठ !अष्टौप्रहर रहा ताठ. भुईला नको लागाय पाठ. तरच जग थोपटेल पाठ! आता बिल्ल्याकडं नीट पहा. काळा रंग नाही त्याचा. गुलाबी तर बिल्कूल नाही. मात्र लाल आऱ्यांसाठी! सांगा! तो कशासाठी? आम्ही तरूण आहोत. आम्ही अभिमानी आहोत. आम्ही कृतिशील आहोत हे जगात दाखविण्यासाठी! त्याचा आठव राहण्यासाठी!! तारूण्य हे वयात नसतं! ते तर मनात असतं!! मनानं सदा तरूण हवं. त्यासाठी एक करा. आळस जरा दूर सारा. स्वाभिमानां जागं करा.संकटात फसला कोणी, मदतीची त्वरा करा.
पहा चक्रासभोवताली. निळा रंग वर खाली. सांगा तो कशासाठी? समर्पणाची आठवण येण्यासाठी. त्यागाची भेट होण्यासाठी. भव्य दिव्य घडण्यासाठी, कोतेपण सोडण्यासाठी, चांगली कामं होण्यासाठी. हे सगळं कुणासाठी? खरंच सांगा - कुणासाठी ? केला आहे कधी विचार? जर तो केला तर ,बदलून जाईल तुम्हा आचार. बदल हा असेल नवा. सर्वां वाटेल अगदी हवा. व्यक्ती विकास म्हणती त्याला. आमचा हेतू साध्य झाला. आपोआप होणार नाही. झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त एक करा. वर्गामध्ये शिका जरा. समाजात पहा जरा. तुमचं ज्ञान जमेल तसं समाजाला द्या जरा. कित्ती तरी नवीन ज्ञान आज पुढं येत आहे. सामान्य जण त्यापासून दूर दूर जात आहे. ते अंतर कमी व्हावं. म्हणून तुम्ही पुढं व्हावं. कोणाला तरी हाती घ्यावं. नवं ज्ञान लोकां द्यावं.लोक नवं ज्ञान घेतील. सुखी - समाधानी होतील. आणि पुन: पुन्हा तुम्हा काही विचारायला येतील.तुमचा साठा मोठा हवा. ज्ञानसाठा नवा हवा. देत गेला वाढत जाईल. दिलं नाही कमी होईल. मान तुम्हा कोण देईल? कधी-कधी काय होतं? सगळं झाल्याव् ध्यानात येतं. पण त्याचा उपयोग नाही. म्हणून करावी लागते घाई. कोणी पुढं येत नाही. आपण तिथं पुढं व्हावं. काय झालं? ध्यानात घ्यावं. जिथं आला असेल पूर, जिथं पसरला असेल रोग, जिथं लागली असंल आग, अथवा असेच काही तरी. आपण पहिलं पुढं व्हावं. मदतीसाठी धावून जावं. डोळे, कान उघडे ठेवा.नको कुणाशी उभा दावा. शत्रूलाही मदत करा. काय होतं! पहा जरा. एक साऱ्यां ध्यानी येतं. हाडवैर संपून जातं. अशीच कित्तीतरी कामं या योजनेत करता येतील. सहस्त्रावधी तरूण हात देशसेवेत जोडता येतील. नुस्तीच कामं नका करू.नाच- गाणं सुध्दा व्हावं. नाटक सिनेमा आपण बघा, दुसऱ्यांनाही तो दावा. मात्र तो कसा हवा? आणि तो कशासाठी? याचा विचार जरूर व्हावा. शिकवण्याची हीच कला तुमच्या आमच्या हातात आहे. आजपर्यंत तिचा वापर अगदी चांगला झाला आहे.
आडाणी, प्रौढ, गरीब लोक शाळेत कधी जाणार नाही. चूक काय? बरोबर काय? नीट कधी पाहणार नाही. यामुळं त्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. रोगराई त्यांच्यासाठी पाचवीलाच पुजलेली.तिचं कारण? कुपोषण! तिचं कारण? अंधश्रद्धा! तिचं कारण? अडाणीपणा! तिचं कारण? गलिच्छपणा! सांगून त्यांना पटणार नाही.आपला हेका सोडणार नाही. प्रगती त्यांची होणार नाही. देश पुढे जाणार नाही. अशाच लोकांसाठी तुम्ही नाटक, सिनेमा करत जावा. कधी एखादा पोवाडा गावा. नवा संदेश त्यातून द्यावा. करमणुकीतून तो दिला जातो. नीट त्यांच्या लक्षात राहातो. आणखी हे ध्यानात घ्यावं. सारं गांव झोपलेलं. आपण त्या गावात जावं. झाडू आपल्या हाती घ्यावा. तसाच तो दुसऱ्यां द्यावा. गांव सारा लख्ख करा. प्रभात फेरी त्वरा करा. प्रबोधनाचा घोष करा. गांव सारा जागा करा. एका जागी करा गोळा. जणू त्यांची भरली शाळा. सांगा पुन्हा नीट जरा. `जंगल तोड कमी करा. वनीकरणा कास धरा. सुख समृध्दी तुम्हा घरा. दारू गांजा सोडून द्यावा. व्यसना इथनं पळवून लांवा. व्यसनाबाबत ध्यानात ठेवा. संगत गुण खूप मोठा. त्यानं होतो खूप तोटा. उपचार तुम्ही करता खरं, जुनी संगत करे तोटा. व्यसना संगत सोडायची तुम्हा, व्यसनींची संगत सोडून द्यावी. जागा, वेळ पण सोडा. गुणी जनां संगत जोडा. कुटुंबासाठी वेळ काढा. करमणूक भरपूर करा. चांगली करमणूक भरपूर करा. धीर द्या त्याला जरा. जमाखर्च त्याला पटवून स्वावलंबी त्याला करा.
सारी पोरं शाळेत लावा. लेकी, सुना शिकायला लावा. लिहितील वाचतील घडाघडा. सावकार उडेल थडाथडा. फिटंल सारं कर्ज पाणी. हवं तुम्हा काय आणि? कर्जा कारण ध्यानी धरा. बडेजाव आणि हुंडा - त्यांना जरा दूर धरा. कायद्याचं पालन करा. कोर्टात जाऊन लग्नं करा.धर्म, जात सोडून द्यावी.सगळ्या खर्चात बचत व्हावी. `समाज मला काय म्हणेल?' मनातली भीती काढून टाका. टळेल समाजाचा धोका. कोणी काही म्हणत नाही. ध्यानी तुमच्या येत नाही. तुमचीच भीती असते तुम्हा. तेवढी फक्त दूर करा. त्याचसाठी शिक्षणाची तुम्ही आता कास धरा. शिक्षणात शिक्षण ,तंत्र शिक्षण! त्याबाबत तयार व्हावं. विज्ञानाच्या मदतीने भ्रम सारं दूर व्हावं. प्रौढ शाळा सुरू होईल. शाळेत जाण्या लाजू नका. रात्री तिथं जाऊन शिका. मग तुम्हा कळून येईल काय झाल्या तुमच्या चुका? ध्यानात आली चूक तुमच्या, पुन्हा तुम्ही चुकू नका. दररोज आपलं काहीतरी तुम्ही नवं नवं शिका. तुमच्यामुळे शिकेल गांव. गांवामुळे तुम्ही शिकाल. कितीही वादळवारा आला, त्यामध्ये तुम्ही टिकाल. तुम्ही टिकला, गांव टिकेल.गांव टिकला, देश टिकेल. एन्.एस्.एस्.मुळेच हे होईल. आता तुमच्या ध्यानी येईल. हे असंच व्हावं असं आमचं म्हणणं बिल्कूल नाही. मात्र इथं एक व्हावं. गरजवंता देता यावं. गरज असता देता यावं. कायद्यानं हात बांधू नये. मदतीआड येऊ नये. निदान ह्या राष्ट्रामध्ये गरीब कोणी राहू नये. सगळ्यांनी कसं एक व्हावं. सुखी समाधानी रहावं. जीवाजीव देत जावा. बंधूभाव निर्माण व्हावा. नवसमाज पुढं यावा.' असं हे सारं - सारं ठरलं. सरकारच्या पण मनात भरलं. १९६९चं साल आलं. गांधी जन्मशताब्दी वर्ष होतं. बापूजींचं स्वप्न होतं. सारा भारत साक्षर असेल. व्यसनमुक्त भारत असेल. श्रमाची तो पूजा करेल. जातीभेदां दूर सारेल. त्यांची आठवण सदा राहील. एन्. एस्. एस्.ते करण्या जाईल. त्या स्वप्ना पूर्ती होईल.
म्हणून एकोणीसशे एकोणसत्तर साली चोवीस सप्टेंबर तारीख आली.एन्.एस्.एस्.ची स्थापना झाली.मुला मुलींनी आता यावं. दोन वर्षे यात रहावं. श्रम सेवा संस्कार व्हावा. समाजाच्या कामा यावा.समाजाची प्रगती व्हावी. एन्. एस्. एस्.ची गाणी गावी ..एन्.एस्.एस्.ची गाणी गावी. गाणं गाताना ध्यानात ठेऊ. बदलला काळ बदलू आपण.नवीन विषय? घेऊ तो पण. चिडचिड करणं, संताप करणं,लक्षात न राहणं, धीर खचणं, बेफाम होणं, दातखिळी बसणं, उदास- उदास वाटणं,बराच काळ एकटं राहणं,कामावरचं लक्ष उडणं, अंगात येणं, मरावसं वाटणं - चांगलं नाही.हे सर्व आजार आहेत.आपल्या मनाचे आजार आहेत. मनाचा साधा आजार? मनाचा साधा डॉक्टर! समुपदेशक म्हणती त्याला.त्याला तुम्ही वेळीच भेटला, पुढचा धोका दूर झाला. झाला याला उशीर तर ? त्याचा आजार गंभीर होतो! कधी आत्महत्या,कधी परहत्या असा प्रकार होताना दिसतो.अशा वेळी? सायकॅट्रिस्ट! तुम्ही त्याची भेट घ्यावी.दीर्घ काळ औषधोपचार सर्वां मनानं तयारी व्हावी.हे नीट समजून घ्यावं.दुसऱ्यांनापण समजून द्यावं. शरीराचा ताप? दुसऱ्यांना कळतो. मनाचा ताप आजाऱ्याला जाळतो. ह्या जाळण्यानं काय होतं? एक आयुष्य,एक संसार त्यांचं अगदी भस्म होतं. आपण हे टाळू शकतो. एन्. एस्. एस्. मधून टाळू शकतो.
तुम्ही आजारी पडता तेव्हा?... डॉक्टरकडं जाता तुम्ही. चांगल्या डॉक्टरकडं जाता तुम्ही. भरपूर बील भरता तुम्ही. मग विचार करता तुम्ही. आता जरा असं करू. आपल्यातल्याच कुणाला तरी डॉक्टर करू. तुमच्यातलं कुणी डॉक्टर होईल.अगदी चांगला डॉक्टर होईल. प..ण... ऑपरेशन जमलं नाही, सारं सारं वाया जाईल.ऑपरेशन शिकायला त्याला, डेड बॉडी मिळायलाच हवी. म्हणून आसपासची डेड बॉडी कॉलेजात जमा व्हायला हवी. देहदान म्हणती त्याला. उपयोग तुमच्या ध्यानी आला. आणखी एक उपयोग बरं, बघा कधी विचार केला? दु:ष्काळ आता वाढत आहे.पाऊस कमी पडत आहे. कारण? जंगल तुटत आहे.एक प्रेत जाळायचं तर किती टण सरण जातं? त्या साठी सांगा बरं कित्ती झाडां मरण होतं? देहदान घडलं तर काही झाडां मरण टळेल. आजूबाजूचा दु:ष्काळ बरं, थोडा तरी दूर पळेल. तुम्ही हे करू शकाल. फक्त तुम्ही ठरवा जरा. मेडिकल कॉलेजमध्ये संपर्क करा. देहदानां संकल्प करा. तशी संकल्प पत्रे भरा. त्याचा जाहीर कार्यक्रम करा. प्रसार माध्यमं हाती धरा. जाहीरपणे संकल्प करा. जे देहदान करतील, त्यांच्या नातलगां सत्कार करा. पुरस्कार देऊन गौरव करा. त्यानं त्यांना बरं वाटेल. देहदान चांगलंच की! इतरांना ते पटेल. अग्नीडागांची संख्या घटेल. डॉक्टरला शिकायला प्रेत भेटेल. त्याची नीट ट्यूब पेटेल. ज्ञानासह आत्मविश्वास डॉक्टर पेशंटला भेटेल. पेशंटचा आजार दूर पळेल. यमदूताची भेट टळेल. हे सर्व तेव्हाच होईल. जेव्हा देहदान होईल. त्यासाठी एन्.एस्.एस्..तिनं पुढं यायला हवं. नव्या काळाचं नवं शिक्षण, तिनं समाजा द्यायला हवं. नव्या शिक्षणाचं महत्त्व तिनं समाजा पटवायला हवं.
एवढ्यावरच थांबू नका. कित्तीच अपघात. त्यातनं शिका. लोकांना समजून सांगा जरा. वाहतुकीच्या नियमां पालन करा. शक्यतो गाडी वापरू नका. प्रदूषण टाळाय शिका. प्रदूषणाचे प्रकार बघा. हवा, पाणी संभाळून ठेवा. नाही तर होईल दगा. त्या साठी प्रयत्न थोडं. चला लावू, जगवू झाडं. अंधार सुध्दा जपून ठेवा. निशाचरां जपा ठेवा. स्थानिक प्रजाती, देशी वाण. सुखसमृध्दीची आहे खाण. चला त्यांचं जतन करू. राष्ट्र आपलं सक्षम करू. आणखी किती सांगू आता? खूssप मोठी N.S.S.ची कथा. झालीय वेळ थांबतो आता.

Very Good!
ReplyDeletevery good Dr. Borate sir....writing should be continue...
ReplyDeleteYes Sir!
Delete