Posts

कथा राष्ट्रीय सेवा योजनेची

Image
-  डॉ. सोपान बोराटे.          पारतंत्र्यात सुरू झालेली ही गोष्ट. भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. राज्य कसलं? हिंदुस्थानच्या भूमीला आणि जनतेला लुटायचं परमिटच ब्रिटिशांना दिलेलं. कच्चा माल अगदी स्वस्तात घ्यायचा. पक्का माल मात्र महागात विकायचा. भारतीय असेच लुबाडले जायचे. या लुटीला मदत व्हावी,अगदी सहजची लूट जास्त व्हावी, त्यासाठी इथलीच माणसं वापरली जावी म्हणून इंग्रजांनी हिंदुस्तानात एक गोष्ट केली. शिक्षणाची गंगा गावोगावी नेली. मुलं-मुली शिकल्या. खूपखूप शिकल्या. कुणी बी.ए. झालं, कुणी एम्.ए. झालं, कुणी आय्.ए.एस्. झालं, कुणी बॅरिस्टर झालं, कुणी डॉक्टर झालं, कुणी शिक्षक झालं तर कुणी इंग्रजांचं निव्वळ चाकर पण झालं. शिक्षण वाढलं. शाळा वाढल्या. शिकणारी मुलं-मुली वाढल्या, आणि काय शिकवावं? कसं शिकवावं? ह्याच्या सरकारच्या चिंता पण वाढल्या. सरकार नडलं. काळजीत पडलं. सरकारचं घोडं अडलं. त्यानं समाजातील मोठ्या माणसांपुढं हात जोडलं. सरकार त्यांना म्हणलं, `काही तरी करा पण ह्या पोरांना काय शिकवायचं त्याचं मार्गदर्शन करा. ही पोरं तुमची, हा देश तुमचा. तेव्हा या देशातील मुलं शि...